top of page

श्री ज्ञानोपासना – करूया ज्ञानाची उपासना

ज्ञान हीच एक सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे.

धार्मिक अध्यात्मिक विषयांवरील ज्ञान एकत्र एका ठिकाणी लेखन, संकलन, संपादन करण्याच्या उद्दिष्टाने "श्री ज्ञानोपासना" या वेब साईटची स्थापना आपल्या साधक परिवारातील एक साधक श्री. श्रीरंग विभांडिक यांनी केली आहे. 

या ठिकाणी आपल्याला विविध विचार, ज्ञानवर्धक लेख, विविध विषयांवरचे लेखन-संकलन-संपादन मिळेल.

आपण आपले अभिप्राय, विचार, सूचना या वेबसाईटवर नोंदवू शकतात. 

https://www.shree-dnyanopasana.cf

Shree Dnyanopasana – Let us Worship the Knowledge

Knowledge is the only best thing.

With the aim of creating knowledge-base on religious and spiritual topics together in one place, this website "Shree-Dnyanopasana" was established by one of the Sadhak from our Sadhak Parivar - Shri. Shreerang Vibhandik.

At this place you will find various thoughts, enlightening articles, creation-compilation-editing on various topics.

You can register your feedback, thoughts, suggestions on this website.

https://www.shree-dnyanopasana.cf

विविध स्तोत्र - मराठी भावानुवाद

SiddhiVinayak-Ganapati.jpg

श्री गणपती अथर्वशीर्ष

hanuman.jpg

श्री अश्वत्थ मारुती पूजन -

हनुमंत पंचरत्न स्तोत्र

shreeram-sita.jpg

श्री रामरक्षा स्तोत्र 

ShreeDatt-01.jpeg

श्री दत्तात्रेय वज्रकवचम्

hanuman.jpg

श्री हनुमान स्तोत्र

Bruhaspati-Dev.png

श्री बृहस्पति पूजन - गुरुस्तोत्रम्

ShreeDatt-01.jpeg

श्री दत्त बावनी - मराठी

hanuman.jpg

श्री हनुमान वडवानल स्तोत्रम्

येथे आपणास विविध स्तोत्र आणि त्यांचा संस्कृत श्लोक/पद अनुसार मराठी भावानुवाद मिळेल. विविध स्तोत्र केवळ मुखोद्गत न करता त्याचा भावार्थ व्यवस्थित समजून घेतला आणि त्याप्रमाणे मनापासून उपासना केली तर निश्चितच त्याचे यथा-योग्य फळ मिळेल. आणि उपासनेचा आनंदही मिळेल.  

तसेच येथे आपणास काही दुर्मिळ स्तोत्र सुद्धा मिळतील.

 

-- श्रीरंग विभांडिक (श्री ज्ञानोपासना)

 

श्री गुरुचरित्र - मराठी भावानुवाद

ShreeDatt-01.jpeg

श्री गुरुचरित्र

ShreeDatt-01.jpeg

श्री गुरुचरित्र - अध्याय ०४

ShreeDatt-01.jpeg

श्री गुरुचरित्र - अध्याय ०१

ShreeDatt-01.jpeg

श्री गुरुचरित्र - अध्याय ०५

ShreeDatt-01.jpeg

श्री गुरुचरित्र - अध्याय ०२

ShreeDatt-01.jpeg

श्री गुरुचरित्र - अध्याय ०६

ShreeDatt-01.jpeg

श्री गुरुचरित्र - अध्याय ०३

ShreeDatt-01.jpeg

श्री गुरुचरित्र - अध्याय ०७

श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘श्रीगुरुचरित्र’ हा ग्रंथ होय.

या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.

श्रीनृसिंहसरस्वतीचे एक शिष्य सिद्ध यांच्या सेवेतच असत. त्यांनीच हे ‘गुरुचरित्र’ आपल्या नामधारक नामक शिष्यास सांगितले अशी कल्पना करून त्याच चरित्राचा विस्तार सरस्वती गंगाधरांनी केला.

सरस्वती गंगाधर हे कानडी ब्राह्मण असून त्यांची मातृभाषा कन्नड आहे. मूळ गुरुचरित्राची भाषा ही प्राकृत मराठी अशी आहे. श्री गुरुचरित्रातील बहुतेक सर्व पदे जरी समजण्यास सहजसुलभ असली तरी, कित्येक शब्द आजच्या काळात पूर्णत: विस्मृतीत गेल्याने त्यांचा योग्य तो अर्थ समजून घेण्यास वेळ लागतो. आणि योग्य अर्थाविना केवळ पारायण करायचे म्हणून वाचण्यात काय अर्थ? त्यातील तत्वज्ञान मूळ आशयासहित समजून घेतले तरच ती खरी गुरुभक्ती होईल. याच उद्देशाने शुद्ध मराठीत श्री गुरुचरित्र शोधायचा प्रयत्न केला असता, बरेच मराठी गद्य भाषांतरे मिळाली, पण ती फक्त सुटी सुटी भाषांतरे होती. त्यामुळे मूळ पदे/श्लोक आणि त्याचा योग्य तो अर्थ याची सांगड घालण्यात परत कष्ट होते.

मला स्वत:ला ही अडचण उद्भवली तेव्हा श्री गुरुचरित्रातील पदे/श्लोक आणि लगोलग त्याचा मराठी भावानुवाद असे करण्याचे प्रयोजन केले.

श्री गुरुचरित्रातील अध्याय आणि त्यांचा भावानुवाद पहाण्यासाठी पुढील अध्यायांच्या Link वर पहा.​

-- श्रीरंग विभांडिक (श्री ज्ञानोपासना)

bottom of page